ठाकरे सरकारचा निर्णय, महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम!

Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...
Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...

मुंबई : भारतातही कोरोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर, ठाकरे सरकारने Thackeray government राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन mission-begin-again लागू राहील असं जाहीर केलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्द

राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. तसंच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : Dear NCB, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार?

तसंच याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असं स्पष्ट केलं आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.

हेही वाचा : नए साल का जश्न पड़ेगा महंगा, जान ले नई गाइडलाइन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here