अंबादास मानकापेवर आणखी एक गुन्हा; स्वतःच्याच आस्थापनांच्या नावावर चार कोटी रुपयांचे विनातारण कर्ज

आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे आणखीन एक अपहार प्रकरण समोर आले. कॅश क्रेडिट कर्ज वाटपाच्या नावाखाली स्वतःच्याच आस्थापनांच्या खात्यात तब्बल ४ कोटी ६ लाख २२ हजार २०५ वळती करून ठेवीदारांची फसवणूक केली.

unsecured-loan-of-4-cr-addition-of-crime-over-ambadas-mankape-adarsh-scam-news-update-marathi-today
unsecured-loan-of-4-cr-addition-of-crime-over-ambadas-mankape-adarsh-scam-news-update-marathi-today

औरंगाबाद:आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे Adarsh Mahila Nagari Sahakari Pathasanstha Maryadit आणखीन एक अपहार प्रकरण समोर आले. कॅश क्रेडिट कर्ज वाटपाच्या नावाखाली स्वतःच्याच आस्थापनांच्या खात्यात तब्बल ४ कोटी ६ लाख २२ हजार २०५ वळती करून ठेवीदारांची फसवणूक केली.

याप्रकरणी विनातारण कर्ज वाटप केल्याच्या प्रकरणात अंबादास मानकापे याच्यासह १४ महिला संचालक, व्यवस्थापक अशा एकूण १९ जणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणी अमानउल्ला हामेदखॉन पठाण (५२) हे तक्रारदार आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा ते शासन नियुक्त लेखापरीक्षक पॅनलवर आहे. त्यांनी २०२२-२०२३ या वर्षाचे जिल्हा आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चे एन-६ परिसरातील मुख्य कार्यालय आणि भारत बाजार, एपीआय कॉर्नर येथील शाखेचे लेखापरीक्षण केले.

त्याचा अहवाल १६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर २०२३ ला जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. यात कॅश क्रेडिट कर्ज वाटपाच्या नावाखाली मानकापे आणि इतरांनी स्वतःच्याच आस्थापनांना विनातारण ४ कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले.

कर्जप्रकरणात एकूण दोन कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणाची खाते उताऱ्यानुसार ३१ मार्च २०२२ वर कमी केलेली येणे रक्कम एक कोटी ३१ लाख ७२ हजार २०५ अशी एकूण चार कोटी सहा लाख २२ हजार २०५ रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

हे आहेत संशयित आरोपी
अंबादास मानकापे, अनिल अंबादास मानकापे, सुनील अंबादास मानकापे, व्यवस्थापक अशोक श्रीपतराव मुगदळ, शाखा व्यवस्थापक जगदीश सोमनाथ कुलीअप्पा, संस्थेच्या अध्यक्ष वनीता सुनील पाटील, संचालिका सविता देविदास अधाने,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here