बदायू : उत्तर प्रदेशातील UP बदायूं Badaun जिल्ह्यात निर्भया सामूहिक बलात्कारासारखीच Nirbhaya Case निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ५० वर्षीय अंगणवाडी सेविकेवर मंदिरातच सामूहिक बलात्कार Gang Rape केला. नराधामांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवून हत्या केली. या घटनेमुळे उत्तरप्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.
रविवार, ३ जानेवारी रोजी सायंकाळी ही ५० वर्षीय अंगणवाडी सेविका मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला मंहत सत्यनारायण, चेला वेदराम व ड्रायव्हर जसपाल यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून देऊन फरार झाले.
अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबियांनी उघैती पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. परंतु पोलिसांनी कुटुंबियांचीच दिशाभूल करत पोलिस ठाण्याच्या चकरा मारायला लावल्या. पोलिसांनी आधी तर अंगणवाडी सेविकेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटनाच खोटी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस सांगत राहिले.
यह भी पढ़ें : Co-WIN App: कोरोना वैक्सीन के लिए कैसे होगा रजिस्ट्रेशन, यह दस्तावेज जरूरी
माध्यमांमध्ये घटना समोर आल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून महंत सत्यनारायण, चेला वेदराम आणि ड्रायव्हर जसपालविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी सोमवार, ४ जानेवारी रोजी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता ५ जानेवारी रोजी तब्बल ४८ तासांनंतर शवविच्छेदन केले.
हेही वाचा : नीरव मोदीची बहिण आणि मेहुणा होणार माफीचे साक्षीदार
शवविच्छेदनात अंगणवाडी सहायिकेवर गुदरलेल्या निर्घृण अत्याचाराचा भंडाफोड झाला. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमांच्या खुणा आढळून आल्या. शिवाय तिच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घुसवल्याचा प्रकारही समोर आला. त्यामुळे आतला भाग फाटल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. एसएसपी संकल्प शर्मा यांनी बेजबाबदार पोलिस निरीक्षक राघवेंद्र प्रतापला निलंबित केले आहे.
अंगणवाडी सहायिकेच्या शवविच्छेदन अहवालात अंगणवाडी सहायिकेवर केवळ सामूहिक बलात्कारच नव्हे तर तिच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घुसवल्याची पुष्टी झाली आहे. तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. आरोपींनी महिलेचा एक पाय आणि फासळीही तोडली. तिच्या शरीरातील रक्त वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
३ जानेवारी रोजी ही सामूहिक बलात्कारानंतर हत्येची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल करून शवविच्छेदन का केले नाही? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला जाऊ लागला आहे. उत्तर प्रदेशातील हत्या,बलात्कार,दंगली या घडनांमुळे नागरिक दहशतीखाली जगत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.