Hathras Gangrape case : पीडितेवर युपी पोलिसांकडून जबरदस्ती अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा आरोप

यूपी सरकारकडून तीन सदस्यीय समितीची स्थापना,सात दिवसात रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश

up-police-cremates-hathras-gangraped-and-murdered-victims-body
पीडितेवर युपी पोलिसांकडून जबरदस्ती अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा आरोप up-police-cremates-hathras-gangraped-and-murdered-victims-body

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

 कुटुंबियांनी आरोप केला की,“माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. परवानगी न घेताच पार्थिव  नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.

बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीच १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here