मुंबई : देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४३ लाखांचा टप्पा ओलांडलाय. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशा परिस्थितीत आपण करोना सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालतोय. नको त्या विषयांवर चर्चा सुरु आहे. असं म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने नाराजी व्यक्त केली आहे.
साध्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका विषाणूने देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४३ लाखांचा टप्पा ओलांडलाय पण आपण करोना सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालतोय. असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.
“देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत आपण ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषणामध्ये कोणालाही रस नाही. आपण नकोत्या विषयांवर चर्चा करत बसलोय.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे.