Condom l भारतातील कंडोम वापराचं प्रमाण कमी का? ‘Condomology’ अहवालात धक्कादायक खुलासे

usage-statistics-of-condom-in-india-and-reasons-behind-it-condomology-survey
usage-statistics-of-condom-in-india-and-reasons-behind-it-condomology-survey

नवी दिल्ली l भारतातील India पहिल्या कंडोमोलॉजी सर्व्हेक्षणातून Condomology Survey धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार 20 ते 24 वयोगटातील 80 टक्के तरुण लैंगिक संबंधांच्या वेळी निरोध (कंडोम) Condom वापरत नसल्याचं समोर आलंय. याचा संबंधित तरुणांच्या आणि त्यांच्या एकूणच आरोग्यावर घातक परिणाम करेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

काय आहे कंडोमोलॉजी सर्वे?

कंडोमोलॉजी हा शब्द कंझ्युमर (ग्राहक), कंडोम (निरोध) आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या तीन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच या सर्वेत या तीनही मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आलाय.

भारतातील तरुणांचं लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाजारपेठेतील कंडोम उत्पादक, पुरवठादार यांच्या ‘कंडोम अलायन्स’कडून हा अभ्यास करण्यात आलाय. कंडोमचा वापर न केल्यानेच भारतात अनियोजित गर्भधारणेच्या अनेक घटना, असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाचा उपयोग आणि लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण अधिक असल्याचंही उघड झालंय.

20 ते 24 वयोगटातील तरुणांकडून कंडोमचा वापर नाही

अहवालात 20 ते 24 वयोगटातील बहुतांश तरुणांनी लैंगिक संबंधांवेळी कंडोमचा वापरच केलेला नसल्याचं समोर आल्यानं याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणं गरजेचं असल्याचं नमूद केलंय. असं केलं तरच लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित गर्भधारणा होईल. अन्यथा भारतातील या तरुणांना या पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

भारतात कंडोमचा वापर इतका कमी का?

भारतातील कंडोम वापराचं सरासरी प्रमाण हे 5.6 टक्के इतकं कमी आहे. समाजातून होणारे संस्कार आणि कंडोम वापरले तर लोक आपल्याला काय म्हणतील किंवा कोण काय विचार करेल अशा अनेक शंका सुरक्षित लैंगिक संबंध आणि लैंगिक आरोग्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहेत.

अहवालातील धक्कादायक खुलासे?

भारतातील केवळ 7 टक्के महिला आणि 27 टक्के पुरुष लग्नाआधीच्या लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरतात. दुसरीकडे केवळ 3 टक्के महिला आणि 13 टक्के पुरुष नियमितपणे लैंगिक संबंधांच्या वेळी कंडोम वापरतात. ही सर्व आकडेवारी 2014-15 मधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातही (NFHS) पाहायला मिळाली होती.

कंडोम वापराबाबत जनजागृतीसाठी अनेक प्रयत्न होऊनही भारतातील कंडोम मार्केटमधील वाढ मागील अनेक वर्षांपासून केवळ 2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे एचआयव्ही (HIV) संसर्गात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here