Uttar Pradesh Crime Capital l देशात खून,बलात्कारांच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेश नंबर वन!

२०२० मध्ये देशभरात सर्वाधिक ३ हजार ७७९ हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर, ३,१५० बिहारमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र

uttar-pradesh-is-top-most-first-number-murder-and-kidnap-state-says-ncrb-crime-report-news-update
uttar-pradesh-is-top-most-first-number-murder-and-kidnap-state-says-ncrb-crime-report-news-update

नवी दिल्ली l भारतात २०२० मध्ये दररोज सरासरी ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, ही आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये दररोज सरासरी ८० हत्यांसह भारतात एकूण २९,१९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हत्येच्या (Murder),बलात्काराच्या (Rape) सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडल्या आहेत.

२०१९च्या तुलनेत २०२०च्या आकडेवारीत १ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१९मध्ये दिवसाला सरासरी ७९ हत्यांसह एकूण २८,९१५ जणांची हत्या झाली होती.

२०२० मध्ये देशभरात सर्वाधिक ३ हजार ७७९ हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर, ३,१५० बिहारमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात २,१६३ हत्या झाल्या आहेत. तर, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये १,९४८ खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच राजधानी दिल्लीत २०२० या वर्षभरात ४७२ खून झाले, असंही या आकडेवारीत म्हटलंय.

२०२० मध्ये दररोज सरासरी ७० बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. वर्षभरात बलात्काराच्या एकूण २८,०४६ घटना घडल्या. एनसीआरबीने म्हटले आहे की, गेल्या वर्षी देशभरात महिलांविरोधील ३ लाख ७१ हजार ५०३ गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली होती. २०१९ च्या तुलनेत २०२०मध्ये ८.३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९मध्ये महिलांविरोधातील ४ लाख ५ हजार ३२६ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२०मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक ५,३१० बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश २,७६९, मध्य प्रदेश २,३३९ आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्रात २,०६१ प्रकरणं नोंदवली गेली. २०१९ मध्ये एक लाख महिला लोकसंख्यमागे गुन्ह्यांचं प्रमाण ६२.३ टक्के होतं, तर हेच प्रमाण २०२०मध्ये ५६.५ टक्क्यांवर होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here