अहो आश्र्चर्यम! रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी 26 वर्षांनी मिळाली

vasai-got-the-stolen-gold-chain-after-26-years-mumbai-police
vasai-got-the-stolen-gold-chain-after-26-years-mumbai-police

वसई : रेल्वे, बस तसेच प्रवासामध्ये वस्तू चोरी जाणे हरवणे काही नवीन नाही. परंतु 26 वर्षापूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली ही घटना खूपच आश्चर्यचकीत करणारी आहे. (Stolen Gold Chain got after many years Vasai). वसईतील पिंकी डीकुना या महिलेची तब्बल 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली आहे. ही सोनसाखळी 26 वर्षांनी मिळाल्याने त्यांनाही धक्का बसला आहे.

सोनसाखळीची घटना 1994 ची म्हणजेच 26 वर्षापूर्वीची आहे. वसई येथील पिंकी डीकुना या वसईहून काही कामानिमित्त चर्चगेटला आल्या होत्या. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांची गर्दीमध्ये सात ग्रॅमची सोनसाखळी गर्दीमध्ये चोरीला गोली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. त्यानंतर 26 वर्षांनी पोलिसांनी आरोपी मोहम्मद निजाम नासिरला अटक केली.

एवढ्या वर्षांनी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली. याचा सर्वांना धक्काच बसला आहे. सोनसाखळी पोलिसांनी पिंकी डीकुना यांच्या घरी जाऊन त्यांना दिली. यावेळी पिंकी यांना आनंद झाला पण धक्काही बसला.  पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here