टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार

vashi-toll-agitation-case-raj-thackeray-to-appear-in-court-today
vashi-toll-agitation-case-raj-thackeray-to-appear-in-court-today

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर २०१४ साली Vashi Toll Plaza झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS Chief Raj Thackeray यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. राज ठाकरे हे आज बेलापूर न्यायालयात दाखल झाले होते. राज ठाकरेंनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी केली जाणार आहे.

जानेवारी २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात टोलनाक्याच्या संदर्भात भाष्य केलं होतं. त्या प्रकरणात न्यायालयात आज सुनावणी झाली.

राज ठाकरे यांनी न्यायालयात दोन अर्ज केले होते. पहिला अर्ज जामिनासाठी होता तर दुसरा अर्ज हा पुढच्या वेळी सुनावणीला हजर न राहण्याचा होता. त्यांचे दोन्हीही अर्ज हे मंजूर झाले आहेत. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरेंना जामीन मंजूर झाला आहे. तसेच आता त्यांना या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीला हजर राहण्याची गरज नसणार आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

वाशी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही. त्यासोबतच न्यायालयाबाहेर बॅरिगेटिंग लावण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत

महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा नवी मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. मनसैनिक न्यायालयाबाहेर दाखल झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत करण्यात आले.

कोर्टाने हजर राहण्याचा समन्स बजावला होता

30 जानेवारी 2014 ला वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये प्रोक्षोभक वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांना जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले.

राज ठाकरे हे आज न्यायालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे.

हेही वाचा : 

फडणवीसांना ‘त्यासाठी’ माझ्या मनापासून शुभेच्छा : संजय राऊत

Chakka Jam: कृषि कानूनों के विरोध में किसानों का चक्‍का जाम आज, क्या खुला, क्या बंद यहां जानें सब

Petrol-Diesel Price Today: आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?; एका क्लिकवर जाणून घ्या

farmers protest : शेतकरी आंदोलनावर UN Human Rightsचं ट्विट; दिला हासल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here