Venugopal Dhoot: व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना CBI कडून अटक

venugopal-dhoot-arrested-cbi-icici-fraud-loan-case-news-update-today
venugopal-dhoot-arrested-cbi-icici-fraud-loan-case-news-update-today

मुंबई : व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत Venugopal Dhoot यांना ICICI बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात CBIने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नुकतीच आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांच्या पतींना अटक केली होती. त्यानंतर लगेचच धूत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

वेणुगोपाल धूत कर्ज प्रकरण नेमकं काय आहे?
२०१२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आलं होतं. हे प्रकरण नंतर एनपीए झालं. तसंच हा फ्रॉडही कसा झाला तेदेखील समोर आलं. २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात ICICI बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचं कर्ज दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं लोन दिलं. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आलं. आता या प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना ICICI च्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांचा लोन प्रकरणात कसा फायदा करून दिला या सगळ्या बाबी सविस्तर लिहिल्या होत्या. धूत यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटींचं लोन दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक यांचा व्यावसायिक फायदा करून दिला. अरविंद गुप्ता यांच्या पत्रानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here