Tabassum Govil passes away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

veteran-actor-tabassum-govil-passes-away-after-cardiac-arrest-mumbai-print-news-news-update-today
veteran-actor-tabassum-govil-passes-away-after-cardiac-arrest-mumbai-print-news-news-update-today

मुंबई: सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम गोवील Tabassum Govil passes away ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम गोविल यांचे निधन  यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.

तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण झाला होता आणि उर्वरित भागाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांचा मुलगा होशांगने दिली. त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी त्यांना पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

१९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचलन केले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्यांनी नर्गिस चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.

त्यानंतर बैजू बावरा चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ मुगल-ए-आज़म अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here