Veteran actor Vikram Gokhale passes away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार

veteran-actor-vikram-gokhale-passes-away-in-pune-Saturday-latest-news-update-today
veteran-actor-vikram-gokhale-passes-away-in-pune-Saturday-latest-news-update-today

पुणे: जेष्ठ अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे आज शनिवारी निधन झाले आहे.(Veteran actor Vikram Gokhale passes away) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेली पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु औषधांचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार वाजता बालगंधर्वमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. आज संध्याकाळी वैकुंठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमांतून गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे २०१६ मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता. नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य गोखले सध्या करीत होते.

अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला. क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी होते.

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट

  • अकेला
  • अग्निपथ
  • अधर्म
  • आंदोलन
  • इन्साफ
  • ईश्वर
  • कैद में है बुलबुल
  • क्रोध
  • खुदा गवाह
  • घर आया मेरा परदेसी
  • चँपियन
  • जख़मों का हिसाब
  • जज़बात
  • जय बाबा अमरनाथ
  • तडीपार
  • तुम बिन
  • थोडासा रूमानी हो जाय
  • धरम संकट
  • परवाना
  • प्रेमबंधन
  • फलक द स्काय
  • बदमाश
  • बलवान
  • यही है जिंदगी
  • याद रखेगी दुनिया
  • लाईफ पार्टनर
  • लाड़ला
  • श्याम घनश्याम
  • सती नाग कन्या
  • सलीम लंगडे पे मत रो
  • स्वर्ग नरक
  • हम दिल दे चुके सनम
  • हसते हसते
  • हे राम

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

  • मॅरेथॉन जिंदगी
  • आघात
  • आधारस्तंभ
  • आम्ही बोलतो मराठी
  • कळत नकळत
  • ज्योतिबाचा नवस
  • दरोडेखोर
  • दुसरी गोष्ट
  • दे दणादण
  • नटसम्राट
  • भिंगरी
  • महानंदा
  • माहेरची साडी
  • लपंडाव
  • वजीर
  • वऱ्हाडी आणि वाजंत्री
  • वासुदेव बळवंत फडके
  • सिद्धांत
  • मुक्ता
  • वजीर

दूरचित्रवाणी मालिका

  • अकबर बिरबल
  • अग्निहोत्र
  • अल्पविराम
  • उडान
  • कुछ खोया कुछ पाया
  • जीवनसाथी
  • द्विधाता
  • मेरा नाम करेगा रोशन
  • या सुखांनो या (मराठी)
  • विरुद्ध
  • संजीवनी
  • सिंहासन

 विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

  • एखादी तरी स्मितरेषा
  • कथा
  • कमला
  • कल्पवृक्ष कन्येसाठी
  • के दिल अभी भरा नही
  • खरं सांगायचं तर
  • छुपे रुस्तम
  • जावई माझा भला
  • दुसरा सामना
  • नकळत सारे घडले
  • पुत्र मानवाचा
  • बॅरिस्टर
  • मकरंद राजाध्यक्ष
  • महासागर
  • मी माझ्या मुलांचा
  • संकेत मीलनाचा
  • समोरच्या घरात
  • सरगम
  • स्वामी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here