ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन

veteran-actress-ashalata-wabgaonkar-dies-due-to-corona-in -satara
अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन veteran-actress-ashalata-wabgaonkar-dies-due-to-corona-in -satara

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांचे आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आशालता यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘आई माझी काळुबाई’ (aai majhi kalubai) या टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान, आशालता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ५ दिवस साताऱ्यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्याशिवाय सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी आई माझी काळूबाईच्या सेटवर मुंबईहून एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी २२ कलाकार आले होते. त्यानंतर सेटवर कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण बंद करण्यात आले. पुढचे चित्रीकरण मुंबईत स्टूडिओमध्ये केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here