Ravi Patwardhan l हरहुन्नरी कलाकार रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका

veteran-marathi-film-actor-ravi-patwardhan-has-passed-away
veteran-marathi-film-actor-ravi-patwardhan-has-passed-away

मुंबई l मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन Ravi Patwardhan यांचं आज रविवार ६ डिसेंबर वृद्धापकाळाने निधन झाले. सिनेसृष्टीत आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाचा दरारा असणाऱ्या रवी पटवर्धन यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कलेची उपासना केली.

गेल्या काही दिवसांपर्यंत ते मनोरंजन क्षेत्रात सक्रीय होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी आपल्या ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

रवी पटवर्धन Ravi Patwardhan यांनी मराठी चित्रपटांसह शेकडो नाटकांमधून देखील काम केलं होतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कला क्षेत्रात कार्यरत होते. छोट्या पडद्यावरील अग्गंबाई सासूबाई या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बबड्याच्या आजोबाची भूमिका केली होती.

६ सप्टेंबर १९३७ साली रवी पटवर्धन Ravi Patwardhan यांचा जन्म झाला होता. अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांच्या भारदस्त व्यक्तीमत्वाला साजेशा अनेक व्यक्तीरेखा त्यांनी पडद्यावर साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं. अनेकदा त्यांनी खलनायकाची भूमिका देखील साकारल्या होत्या.

हेही वाचा l mahaparinirvan Din l राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन; इथे पहा थेट प्रक्षेपण

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांतला पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ‘वस्ताद पाटील’ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील. सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं.

१९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाटट्यमोत्सवाचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले.

वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले.

हेही वाचा l Netflix, Amazon Prime ला टक्कर,आलं नवीन लायन्सगेट प्ले ओटीटी अ‍ॅप

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशा असाव्या सुना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’ ते अगदी अलीकडचा ‘हरी ओम विठ्ठला’ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे.

एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here