fatema zakeria l माजी मंत्री दिवंगत डॉ. रफिक झकेरिया यांच्या पत्नी पद्मश्री फातेमा झकेरिया यांचे निधन

vetern-social-worker-padmashree- President-fatema-zakeria-passed-away-in-aurangabad- Dr.Rafique Zakaria- Maulana Azhad Education Trust
vetern-social-worker-padmashree- President-fatema-zakeria-passed-away-in-aurangabad- Dr.Rafique Zakaria- Maulana Azhad Education Trust

औरंगाबाद l महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री, औरंगाबादचे शिल्पकार दिवंगत डॉ. रफिक झकेरिया Dr.Rafique Zakaria यांच्या पत्नी मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या Maulana Azhad Education Trust अध्यक्षा President पद्मश्री फातेमा रफिक झकेरिया Padmashree fatema zakeria यांचे मंगळवारी वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. अरशद झकेरिया हे उद्योगपती असून, फरिद झकेरिया हे पत्रकार आहेत. दोन्ही मुलं विदेशात राहतात.

फातेमा झकेरिया यांनी गेली पन्नास वर्षे विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी पत्रकारितेबरोबरच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुविध कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते.

फातेमा झकेरिया यांचा मुंबईत १७ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला जन्म

फातेमा झकेरिया यांचा जन्म मुंबईत १७ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला होता. त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमधून शिक्षण घेतले होते. समाजकार्य विषयात घेतलेल्या आपल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करत त्यांनी १९५८ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चिल्ड्रेन अँड वुमेन या संस्थेद्वारे मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी ५०० हून अधिक मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची काळजी वाहिली होती.

१९७०मध्ये टाइम्स ऑफ इंडियामधून पत्रकारितेला सुरुवात

फातेमा झकेरिया यांनी १९७०मध्ये टाइम्स ऑफ इंडियामधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. १९८० च्या दशकात ‘द विकली’ या नामांकित साप्ताहिकात महत्वाच्या विविध पदांवर काम केले. त्या मुंबई टाइम्सच्या संपादिका होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे एडिटर, ताज नियतकालिकाच्या संपादिका आदी पदांवरही त्यांनी काम केले होते. त्या काळात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जयप्रकाश नारायण, जेआरडी टाटा, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चरणसिंग अशा मोठ्या नेत्यांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.

केंद्र सरकारच्या ‘या’ समितीत होत्या सदस्या

फातेमा झकेरिया या उत्तम भाषांतरकारही होत्या. त्यांनी डॉ. झाकीर हुसेन, कृष्ण चंदर अशा प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचे उर्दूतून इंग्रजीत भाषांतर केले आहे. पत्रकारितेतील त्यांच्या  योगदानाची दखल घेत त्यांना १९८३ मध्ये सरोजिनी नाडयू एकत्रिकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  फातेमा झकेरिया या केंद्र सरकारने माध्यमांची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here