आ. विक्रम काळे विजयाच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकांच्या भेटीला

Vikram Kale visiting teachers on the day after victory
Vikram Kale visiting teachers on the day after victory

औरंगाबाद: औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळविणाऱ्या महाविकास आघाडीचे (Maha vikas aghadi) उमेदवार आ. विक्रम काळे (MLA Vikram kale) यांच्या समर्थकांनी गुरूवारी (दि.२) रात्री जल्लोषात मिरवणुक काढली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आ. काळे यांनी देवदर्शन घेऊन विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांशी संवाद सधात निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. विजयानंतर दुसऱ्याच दिवशी आ. काळेंनी शिक्षकांच्या हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान झाले. त्यानंतर २ फेबु्रवारीला चिकलठाणा एमआयडीसी येथे मतमोजणी झाली. सकाळपासूनच मतांचे २५-२५ गठ्ठे तयार करत असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार आ. काळे व त्यांच्या समर्थकांना विजयाचा विश्वास होता. पहिली फेरीनंतर विजयासाठी कोटा निश्चित केला जात असतानाच लावलेल्या गणितानुसार कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली होती. मतमोजणी केंद्रावर सायंकाळीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष सुरू होता. त्यानंतर टिव्ही सेंटर येथून आ. काळे यांची विजयी मिरवणुक काढण्यात आली. तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर टिव्ही सेंटर ते गोदावरी पब्लिक स्कुलपर्यंत विजयी मिरवणुक व वाहनफेरी काढण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्ये, समर्थकांनी एकच जल्लोष केला. शाळेच्या प्रांगणात आल्यानंतरही फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. सतत चौथ्यांदा या मतदारसंघातून आ. काळे यांनी जिंकूण येण्याचा विक्रम नोंदविला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.३) आ. काळे यांनी घृष्णेश्वर, भद्रा मारुती यासह परिसरातील दर्गा येथे जावून दर्शन घेतले. त्यानंतर परिसरातील शाळांना भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधत निवडणुकीबद्दल आभार व्यक्त केले.

रॅलीत स्वता चालविली दुचाकी…विजयाची चाहुल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली होती. टिव्ही सेंटर येथून काढण्यात आलेल्या वाहन रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना दुचाकी चालविण्याचा आग्रह केला. त्यानंतर लगेचच आ. काळेंनी कार्यकर्त्यांची दुचाकी हाती घेऊन त्यांना पाठीमागे बसवून वाहन रॅलीत सहभाग नोंदविला.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणार…मराठवाड्यातील प्रत्येक शिक्षकाला अगदी सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणून माझी ओळख आहे. विजयानंतर दुसऱ्याच दिवशी विविश शाळांना भेटी देऊन कामास सुरूवात केली आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी पहिल्यापासूनच कार्यरत आहे. यानंतरही जुनी पेन्शन योजनेसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. शिवाय ‘आमदार आपल्या दारी’, ‘शिक्षक दरबार’ उपक्रम राबवून शिक्षकांचे प्रश्न सोडविणार आहे.

आ. विक्रम काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here