Vinayak Mete : विनायक मेटेंच्या अपघातामागचं गूढ वाढलं, ३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या!

मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल

vinayak-mete-car-accident-suspicious-vehicle-was-chasing-claims-shiv-sangram-workers-news-update-today
vinayak-mete-car-accident-suspicious-vehicle-was-chasing-claims-shiv-sangram-workers-news-update-today

मुंबई:  शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं दोन दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात होता. मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांच्या एका सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) असे सहकाऱ्याचे नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे ०३ ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.  फोन कॉल रेकॉर्डमधील संवादानुसार, ०३ ऑगस्टला विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे (Mumbai) जात होतो. त्यावेळी शिक्रापूरपासून (Shikrapur) दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये आयशर ट्रक देखिल होता. असा आरोप केला होता.

विशेषत: विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात असून त्यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांची वेगवेगळी पथके तपास करत असताना आता अजून एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. हा दावा विनायक मेटेंसोबत काही दिवसांपूर्वी बीड ते पुणे प्रवास केलेल्या एका कार्यकर्त्याने केला असून त्यावरून मेटेंच्या अपघातामागचं गूढ अधिकच वाढलं आहे.

नेमकं झालं काय?

मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मेटेंच्या पत्नीची चौकशीची मागणी

दरम्यान, माळकर यांच्या धक्कादायक खुलाशानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच मेटे यांच्या गाडीचा तीन ऑगस्ट रोजी पाठलाग करणाऱ्या आणि घटनेवेळच्या गाडीचा तपास करण्यात यावा अशी मागणीची मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here