पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणी विनायक राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप; म्हणाले…

Vinayak Raut's serious allegations against Narayan Rane in the death of journalist Shashikant Warise
Vinayak Raut's serious allegations against Narayan Rane in the death of journalist Shashikant Warise

नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा,” अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे.

 “पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड आहे. त्याने यापूर्वी असे अनेक प्रयत्न केले आहेत. २०२० साली कुंभवडेला मनोज महेकर या तरुणाच्या अंगावरही गाडी घालत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, त्याचे वडील रिफायनरी विरोधी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.

“आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. वारिसेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे,” असेही विनायक राऊतांनी म्हटलं.

 “

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here