लहान कुत्र्याची गोंडस पिल्ले सर्वांनाच आवडतात. तुम्हाला देखील कुत्र्याची पिल्ले आवडत असतील किंवा असे व्हिडीओ पाहायला आवडत असतील तर हा व्हिडीओ नक्की पाहा. @hopkinsBRFC21 या अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये ५ ते ६ कुत्र्याची पिल्ले एका माणसाकडून पोहण्याचे धडे गिरवताना दिसून येत आहेत. Viral video puppies are learning how to swim
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये एक माणूस एका तळ्यात उभा असलेला दिसत असून ही पिल्ले पोहण्यासाठी एका रांगेत शिस्तीत उभी आहेत. तो माणूस पिल्लांवर पाळत ठेवून आहे तसेच त्या पिल्लांना दुसऱ्या बाजूला जाण्यापासून रोखत आहे. अशाप्रकारे ही सर्व पिल्ले पोहण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
The cutest swimming lesson ever 😍❤️ pic.twitter.com/BXjELj2yzf
— ❤️ A page to make you smile ❤️ (@hopkinsBRFC21) September 11, 2021
हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती या पिल्लांना प्रोत्साहन देत आहे. ‘सर्वांत सुंदर पोहण्याचा धडा’ असे कॅप्शन या व्हिडीओसोबत लिहिले आहे. हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून जवळपास ८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओच्या कंमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे.
“मोहक! मी पोहण्याचे बरेच धडे शिकवले आहेत पण यासारखे सुंदर नाही. पाण्यात आत्मविश्वास असणे चांगले आहे – छान कामगिरी केली पिल्लांनो.” असे एक वापरकर्ती म्हणाली. तर, “हे छोटे फ्लफबॉल किती सुंदर आहेत?!” असे दुसरी वापरकर्ती म्हणाली. “सुंदर क्षण.” असे तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे.