Vj chitra l अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

vj-chitra-death-tv-actress-commits-suicide
vj-chitra-death-tv-actress-commits-suicide

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीजे चित्राने vj-chitra चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ती केवळ २८ वर्षांची होती. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं.

चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने आत्महत्या केली. चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला.

हेही वाचा l Moto G9 Power स्मार्टफोन झाला लाँच, पाहा खास फिचर्स आणि किंमत

नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचं हेमंतने सांगितलं.

“शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही.

हेही वाचा l Maratha reservation l आज घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी

त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला”, अशी माहिती हेमंतने पोलिसांना दिली.

हेही वाचा l गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती, तरीही शेतकरी आंदोलन थांबवता आले नाही

‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. त्यांमुळे तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here