Vodafone-idea ग्राहाकांना झटका, मोजावे लागणार जास्त पैसे

vodafone-idea-hikes-prices-of-two-postpaid-plans-check-details
vodafone-idea-hikes-prices-of-two-postpaid-plans-check-details

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने vodafoneidea आपल्या युजर्सना झटका दिलाय. कारण कंपनीचे दोन लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आता महाग झाले आहेत. vodafone-idea-hikes-prices-of-two-postpaid-plans  

कंपनीच्या 598 आणि 749 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसाठी आता युजर्सना 50 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. म्हणजे 598 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 649 रुपये, आणि 749 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 799 रुपये मोजावे लागतील.

हेही वाचा l MDH मसालेचे मालक धर्मापाल गुलाटी यांचं निधन

नव्या किंमतीसह हे दोन्ही प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झाले आहेत. हे दोन्ही प्लॅन कंपनीच्या RED फॅमिली प्लॅनचा हिस्सा आहेत.

Vodafone Idea – 649 रुपये आणि 799 रुपयांचे फायदे

649 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत दर महिन्याला एकूण 80 जीबी डेटा आणि एकूण 100 एसएमएसची सुविधा मिळते.

या प्लॅनअंतर्गत तुम्ही दोन कनेक्शन वापरु शकतात. 80 जीबी डेटापैकी 50 जीबी डेटा मुख्य युजरला आणि उर्वरीत 30जीबी डेटा अन्य युजरला मिळतो.

तर, 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 120 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनअंतर्गत तीन कनेक्शनचा सपोर्ट मिळतो.

हेही वाचा l Xiaomi चा स्मार्टफोन झाला स्वस्त,पाहा किमत फीचर्स

120 जीबी डेटापैकी 60जीबी डट मुख्य युजरला आणि अन्य दोन युजरसाठी 30-30जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅनमध्ये एका वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम, झी-5 आणि Vi मूव्हीज अँड टीव्हीचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here