Vodafone Idea चा नवा फॅमिली प्लान, अनलिमिटेड डेटा व्हाइस कॉलिंग

vodafone-idea-postpaid-family-plan-rs-948-voice-call-unlimited-data-and-other-benefits
vodafone-idea-postpaid-family-plan-rs-948-voice-call-unlimited-data-and-other-benefits

व्होडाफोन व आयडियाने vodafone-idea (Vi) ९४८ रुपयांचा पोस्टपेड फॅमिली प्लॅन postpaid-family-plan आणला आहे. त्यात प्रायमरी वापरकर्त्यांना अनलिमिटेड डाटा व व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. ९४८ रुपयांचा Rs-948-voice-call-unlimited-data हा फॅमिली प्लॅन दोन कनेक्शनसाठी उपलब्ध असून, वापरकर्ते यात ५ सदस्यांना जोडू शकतात. प्रति नवीन कनेक्शनसाठी २४९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

OnlyTech ने रिपोर्टनुसार , हा ९४८ रुपयांचा पोस्टपेड फॅमिली प्लॅन सध्या उत्तर प्रदेश सर्कलमध्ये ३ डिसेंबर पासून उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅन अंतर्गत येणाऱ्या प्रायमरी कनेक्शनला अनलिमिटेड हाय स्पीड डाटा देण्यात आला असून, सेकंडरी कनेक्शनला ३० जीबी पर्यंत डाटा मिळतो.

सोबत सेकंडरी कनेक्शनसाठी ३० जीबी डाटा रोलओव्हर सुविधा देण्यात येते. व्हॉइस कॉल बेनिफिट्समध्ये ९४८ रुपयांच्या पोस्टपेड फॅमिली प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्सचा सुद्धा समावेश आहे. प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनला प्रति महिना १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे.

व्होडाफोन व आयडियाच्या (Vi) मतानुसार, अनिलमिटेड डाटा आणि व्हॉइस लाभ पोस्टपेड प्लॅन्सची बिल सायकलच्या आत कोणत्याही व्यक्तीस १५० जीबी हून अधिक डाटा आणि ५० पेक्षा कमी व्हॉइस कॉलिंग (इनकमिंग कॉल मिळून) ला कमर्शियल मानण्यात येईल. जरी तुम्हाला अनलिमिटेड लाभ मिळणार असे दिसत असले तरी अनलिमिटेड ऑफर नसून मर्यादित आहे.

हेही वाचा : Nokia ची लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, Nokia PureBook X14 लाँच

त्याशिवाय ९४८ रुपयांच्या पोस्टपेड फॅमिली प्लॅनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनला वार्षिक Vi Movies और TV चे सबस्क्रिप्शन देण्यात येते. प्रायमरी कनेक्शनच्या वापरकर्त्यांना कोणत्याही बेसिकवर विना शुल्क Amazon Prime Video आणि Zee5 Premium सबस्क्रिप्शन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here