शेतकरी, तरुण उघड्यावर व मुठभर लोकच गडगंज असा हिंदुस्थान नको आणि तो आम्ही होऊ देणार नाही !: राहुल गांधी

We don't want an India like farmers, youths in the open and a handful of people and we will not allow it to happen!: Rahul Gandhi
We don't want an India like farmers, youths in the open and a handful of people and we will not allow it to happen!: Rahul Gandhi

शेगाव : मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरींगचे शिक्षण घेतात आणि  त्यांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरूण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही, असा खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ठणकावून सांगितले.

संत गजानन महाराज यांची पवित्र भूमी शेगाव येथे आज लाखो लोकांच्या अतिप्रचंड विशाल सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.  विशाल व्यापपीठावर देशभरातील व राज्यातील नेते उपस्थित होते. जिथपर्यंत नजर जाईल ताथपर्यंत लोक राहुल गांधींना ऐकण्यासाठी आले होते.

या विशाल जनसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतक-याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही. पीकविमाही मिळत नाही. शेतकरी 50 हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडे रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होती तेव्हा तो जीवन संपवण्याचे टोकाचा निर्णय घेतो. विदर्भातील शेतक-यांचे कळताच युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतक-यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतक-याची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.

मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो
कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भिती पसरवण्याचे काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव अहिंसा याने  लोक एकछूट होतात. विरोधक विचारात की देशात कुठे आहे सिंसा, भीती, द्वेष ? असा प्रश्न विचारणा-या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकले तर मग कळेल की द्वेष, हिंसा, भिती कुठे आहे ?

द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे,  ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जीजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींनी मराठीतून भाषण करत जनतेला साद घातली, ते म्हणाले, सकाळी मी राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत चाललो, राहुल गांधी हे सामान्य जनता, गरिब, पीडीत लोकांचे दुःख हलके करण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी ज्या रस्त्याने जातात तिथली गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावून गरिबीचे दृष्य झाकले जाते. महात्मा गांधी हे सुद्धा गरिबांच्या झोपडीत जात असत.

देश तोडण्याची वाट पहात आहेत का ?

दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी, मोतिलाल नेहरू,पंडित नेहरू सहभाग झाले होते आणि आज मला राहुल गांधींसोबत चालण्याचे भाग्य लाभले. भारत जोडो यात्रेवर विरोधक  टीका करत आहेत. देश तुटला आहे का असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पहात आहेत का ? असा सवाल करत, दृष्टा नेता तोच असतो ज्याला देश तुटण्याची चाहुल लागताच तो देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्याचे काम करण्याचे औचित्य काय ?

विधिमंडळ काँग्रेस नेते व भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आजचा प्रसंग अविस्मरणीय आहे, एवढी प्रचंड सभा कधी झाली नाही. सभेला जमलेली ही उत्स्फुर्त गर्दी आहे. राहुल पदयात्रेच्या माध्यमातून लोकांचे अश्रु पुसण्याचे काम करत आहेत, आपुलकी, जिव्हाळा , प्रेम वाटत ते निघाले आहेत व हजारो लोकांच्या साथीने संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी ते निघाले आहेत. स्वातंत्र्यांची 75 वर्षे साजरी करत असताना लोकशाहीवर घाला घालण्याचे काम केले जात आहे. भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी भारत जोडो यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहील, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहु असे आवाहन त्यांनी केले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, के.सी.वेणूगोपाल,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कन्हैयाकुमार, यशोमती ठाकूर या॔नीही जनतेला संबोधित केले. या सभेेला काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.राहुल बोंद्रे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा.डॉ.फौजीया खान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष एड.नाझेर काजी, काँग्रेस व शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. 

सभेसाठी विशाल व्यासपीठ उभे करण्यात आले होते , राहुल गांधी यांना व्यासपीठावर वारकरी परंपरेचे दर्शन दाखवणारे छोटीशी दिंडी काढण्यात आली होती. राहुल गांधींनी वारक-यांची पताका फडकवली.सभेच्या आधी राहुल गांधी यांनी गजानन महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here