…नारायण राणेंची काय किंमत आहे;अशोक चव्हाणांचा टोला

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर नारायण राणे यांनी केली होती टीका

... What is the value of Narayan Rane; Ashok Chavan
... What is the value of Narayan Rane; Ashok Chavan

औरंगाबाद l  नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे Narayan-Rane यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok-Chavan यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण Ashok-Chavan  औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलें. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले की, ” माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही.

पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.”

काय म्हणाले होते नारायण राणे

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा भाजपा खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली होती. राणे म्हणाले की, दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कुठलाही ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड होती.

वाचा l भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या : शिवसेना

असं भाषण यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं.मुख्यमंत्री म्हणून एकवर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकास कामाचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत.

राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे. कोणाबद्दल काय बोलावं हे कळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाला लायक नाही. पंतप्रधानांबद्दल त्यांच्या कामाबद्दल बोलण्याची मुख्यमंत्र्यांची योग्यता नाही, असे नारायण राणे म्हणाले.

वाचा l  Cucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदे

आमच्याकडे नजर फिरवू नका, पळताभुई थोडी होईCucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदेल. बेडूक एका दिशेने जातो, गांडुळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मातोश्रीचा इतिहास बाहेर काढेन असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

  

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here