रत्नागिरी | पोटापाण्यासाठी लोकांनी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. मात्र, भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला.
पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा l Jaysingrao Gaikwad l माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपाला रामराम
फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले. भास्कर जाधव यांच्याकडून राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं आहे. विधानसभेच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत.
हेही वाचा l बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त अजित पवारांनी दिला ‘हा’ संदेश