नवी दिल्ली: व्हॉटसअॅपने (whatsapp) भारतीय वापरकर्त्यांना मेसेजिंग अॅपच्या बनावट आवृत्त्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. व्हॉटसअॅप सारख्याच दिसणाऱ्या या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमची व्यक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅअपचे सीईओ, विल कॅथकार्ट यांनी ट्वीट करत व्हॉट्सअॅपची सुधारित आवृत्ती न वापरण्याची विनंती केली आहे.
व्हॉटसअॅप कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अॅटप सापडले आहेत ज्या व्हॉटसअॅपच्या सीईओंचा भारतीय ग्राहकांना इशारा सारख्याच सेवा देण्याचा दावा करतात. “HeyMods” नावाच्या डेव्हलपरचे “Hey WhatsApp” सारखे अॅप धोकादायक आहेत आणि लोकांनी ते डाउनलोड करणे टाळावे. या बनावट अॅसपच्या माध्यमातून तुमची व्यक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका असल्याचेही व्हॉटसअॅगपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Good post: using a modded WhatsApp version is never a solution for your privacy and security.
Download the latest public release for Android: https://t.co/TzvR1dJz9y pic.twitter.com/rERxMlTQgx
— WABetaInfo (@WABetaInfo) July 12, 2020
व्हॉटसअॅपच्या सुधारित किंवा बनावट आवृत्त्या व्हॉटसअॅटपसारखीच सेवा देतात. पण व्हॉटसअॅहपची मूळ आवृत्ती तुमच्या व्यक्तिक माहितीचे संरक्षण करते. मात्र, हे व्हॉटसअॅप सारखे अॅवप तुमच्या व्यक्तीक माहितीचे संरक्षण करण्यापेक्षा त्याचा गैरवापर करु शकते अशी भीती व्हॉटसअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी व्यक्त केली आहे.
व्हॉटसअॅलपची नवीन बनावट आवृत्ती प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, परंतु जे वापरकर्ते अनाधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून व्हॉटसअॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी अॅप डाउनलोड करण्याच्या अगोदर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा गुगल प्ले सारख्या विश्वसनीय अॅइप स्टोरद्वारेच व्हॉटसअॅरपची अधिकृत आवृत्ती डाउनलोड करावी, असा सल्लाही कॅथकार्ट यांनी दिला आहे.