WhatsApp : नवीन अटी स्वीकारा नाहीतर WhatsApp अकाउंट Delete करा !

नवीन अटींबाबत अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

whatsapp-not-run-on-smartphones-from-tomorrow-see-full-list-update
whatsapp-not-run-on-smartphones-from-tomorrow-see-full-list-update

नवी दिल्ली l  पुढील वर्षापासून कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना आपल्या WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. WhatsApp चा वापर करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी स्वीकारणं अनिवार्य असेल. नवीन अटींबाबत अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे.

WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींचा privacy policy एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जर आमच्या अटी स्वीकारायच्या नसतील तर युजर्स त्यांचं WhatsApp अकाउंट डिलीट करु शकतात, असं या स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे.

WhatsApp ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार

WhatsApp ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार आहे. The Independent च्या रिपोर्टमध्येही 8 फेब्रुवारीपासून व्हॉटसअ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना कंपनीची नवीन पॉलिसी स्वीकारावीच लागेल, अन्यथा त्यांना अकाउंटचा वापर करता येणार नाही, असं म्हटलंय.

हेही वाचा l वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक

WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याचीही माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here