
औरंगाबाद: सोमवारी दुपारी सिटी बस (City Bus) मध्ये बसलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा खिडकी मधून बाहेर बघताना औरंगपुरा बस स्थानक (Aurangabad Bus Stop) येथे डोक्याला गंभीर मार लागला. ह्या अपघातात सदर मुलाचा मृत्यू झाला. हरीओम पंडीत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
सोमवारी दुपारी जवळपास 12.30 वा बस क्रमांक एम एच 20 इ जी 9862 साजापुर ते औरंगपुरा मार्गाची आपली अंतिम फेरी करून औरंगपुरा बस स्थानकाला परतली होती. डेपो वर बस घेऊन जायला बस फिरवण्यासाठी ड्रायव्हर ने जिल्हा परिषद मैदानात न्यायची होती तेव्हाच काही शाळकरी मुलं बस मध्ये येऊन बसले. ह्यात सरस्वती भुवन विद्यालयाचा नववी वर्गात असलेल्या हरिओम राधाकृष्ण पंडित बसच्या एकदम शेवटच्या सीट वर जाऊन बसला व खिडकीतून बाहेर बघत होता तेव्हाच त्याचा डोक्याला मैदानाच्या गेटला लगत लोखंडी पोलचा मार लागला व तो जखमी झाला.
बस ड्रायव्हर कपिल अशोक लोखंडे व कंडक्टर योगेश बिडवे हे लगेच मुलाला रिक्षेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयला घेऊन गेले. घटना ची माहिती मुलाच्या कुटुंबाला देण्यात आली. रुग्णालयात मुलाला मृत घोषित करण्यात आले.
सोमवार संध्याकाळी पर्यंत सदर शव विच्छेदनाचा अहवाल अपेक्षित आहे. ह्या घटनेची नोंद क्रांतीचौक पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
कुटुंबियांना मदत करु…
मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी (dr. abhijit choudhary) म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुलाच्या कुटुंबाला शासनाच्या निकषाप्रमाणे शक्य तेवढी मदत करण्यात येईल.



































































































































