राहुल गांधींबरोबर दिसणारी ‘ती’ महिला कोण? ; काँग्रेसनं दिलं उत्तर!

हिरव्या कॅज्यु्ल टीशर्टमध्ये दिसणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत एक महिलाही आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे.

who-is-that-woman-seen-with-rahul-gandhi-a-storm-of-discussion-on-social-media-congress-answered-news-update-today
who-is-that-woman-seen-with-rahul-gandhi-a-storm-of-discussion-on-social-media-congress-answered-news-update-today

वी दिल्ली: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अचानक उजबेकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यापेक्षाही त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींबाबत सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हिरव्या कॅज्यु्ल टीशर्टमध्ये दिसणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत एक महिलाही आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी ट्रॅव्हल बॅग घेऊन उभे असून त्यांच्याबरोबर एक महिला आणि एक पुरुष आहे. असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राहुल गांधींसोबत असलेली ती महिला कोण असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जात आहे. सरकारमधील अनेक नेत्यांनीही हा फोटो शेअर करून राहुल गांधी यांच्यासोबत असणारी ती महिला कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नांवर कांग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी उत्तर दिलं आहे.

 X या समाजमाध्यमावरून त्यांनी पोस्ट करत या फोटोबाबतचा खुलासा केला आहे. “आंधळे संघी आणि २ रुपयांच्या भाजपाच्या टोलर्सची मला दया येते. कारण तुम्हाला मित्र नाहीत किंवा तुमच्यासोबत फिरायला आवडणारे लोक तुमच्याकडे नाहीत. फोटोमधील गृहस्थ हे राहुल गांधी असून त्यांच्याबरोबर त्यांचे बालपणीचे मित्र अमिताभ दुबे आणि ती महिला अमिताभ यांची पत्नी अमूल्या आहे”, असं सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या.

कोण आहेत अमिताभ दुबे?

अमिताभ दुबे हे २००७ मध्ये टीएस लोम्बार्डमध्ये सामील झाले होते. राजकारण आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतीय संघाचे सह-प्रमुख आहेत. अमिताभ यांनी यापूर्वी राजकीय जोखीम विश्लेषक, बिझनेस स्टँडर्ड आणि बिझनेस इंडिया टेलिव्हिजन सारख्या माध्यमांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here