
मुंबई: मेट्रोचा खांब कोसळल्याने अडीच वर्षांच्या मुलासह आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूच्या नागवारा भागात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. तेसस्विनी (२५ ) आणि विहान (२.५) अशी या दोघांनी नावे आहेत. दरम्यान, या घटनेत विहानचे वडील जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २५ वर्षीय तेजस्विनी आपल्या पती आणि अडीच वर्षाच्या मुलासह बाईकने हेब्बलच्या दिशेने जात होते. यावेळी नागवारा पोहोचताच अचानक एक अंडर कंस्ट्रक्शन मेट्रोचा खांब त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत तेजस्विनी आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला तर, तिचे जखमी झाले असून त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना बंगळुरू ईस्टचे डीसीपी भीमाशंकर गुलेड म्हणाले, ”हे दाम्पत्य आपल्या मुलासह हेब्बलच्या दिशेने जात होते. मात्र, मेट्रो खांब ओव्हरलोड झाल्याने अचानक त्यांच्या अंगावर कोसळला. स्थानिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालायात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आई आणि मुलाला मृत घोषित केले. याप्रकरणी आम्ही पुढील तपास सुरू आहे.”