वंडर वूमन १९८४ wonder-woman-1984 हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. येत्या २५ डिसेंबरला जगभरातील सिनेमागृहांमध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी वंडर वूमन १९८४ चा wonder-woman-1984 ओपनिंग सीन ऑनलाईन प्रदर्शित केला आहे.
‘वंडर वुमन १९८४’ हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री गल गडॉट हिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.
वंडर वूमन १९८४ मध्ये अभिनेत्री गॅल गेडॉट हिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. ऑनलाईन प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये वंडर वूमनचं बालपण थोडक्यात दाखवण्यात आलं आहे.
वंडर वुमन अर्थात डाएना प्रिंस लहानपणापासून शूर योद्धा असते. युद्धकलेत निपूण असलेली डाएना सुपरहिरो वंडर वूमन कशी होते? हे थोडक्यात या तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
Journey to Themyscira and see young Diana in action in this exclusive first look at the opening scene of #WonderWoman1984, in theaters and on HBO Max December 25. pic.twitter.com/3I2jIZilGE
— HBO Max (@hbomax) December 15, 2020
या चित्रपटामध्ये १३ वर्षीय अभिनेत्री लिली एस्पेल हिने वंडर वूमनच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. तिने या व्हिडीमध्ये केलेले स्टंट पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत.
तिच्या जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा l corona-vaccine l ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार कोरोनाची लस