wood-apple : कवठ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

wood-apple – benefits
कवठचे खाण्याचे फायदे wood-apple – benefits

कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. काही जण फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खातात. विशेष म्हणजे कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

कवठचे फायदे जाणून घेऊयात

कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात.

कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.

कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकतो.

मळमळ, उलटी होत असल्यास कवठ खावे. त्यामुळे त्रास कमी होतो.

जुलाब होत असल्यास कवठ खावे.

भूक लागत नसल्यास किंवा कमी झाल्यास कवठ खावं.

अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो.

( कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला घेणे आवश्यक आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here