Seema Haider Love Story:सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीवर यशराज मुखाटेनं बनवलं गाणं! पहा भन्नाट व्हिडीओ

yashraj-mukhate-composes-track-on-seema-haider-love-story-funny-video-clip-viral-on-instagram-see-netizens-comedy-recations-news-update-today
yashraj-mukhate-composes-track-on-seema-haider-love-story-funny-video-clip-viral-on-instagram-see-netizens-comedy-recations-news-update-today

Yashraj Mukhate Track On Seema Haider Love Story : सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ किंवा कोणत्याही डायलॉगबाजीवर गाणं बनवण्यासाठी यशराज मुखाटे यांना ओळखलं जातं. अनेक प्रकारचे जबरदस्त गाण्यांचे व्हिडीओ पोस्ट करून ते इंटरनेटवर लोकप्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदरच्या प्रेमप्रकरणाचे किस्से इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता व्हायरल झालेल्या नवीन व्हिडीओनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण यशराज मुखाटे यांनी सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीवर भन्नाट गाणं बनवलं आहे.

लप्पू सा सचिन…झिंगूर सा लडका असं या गाण्याचे बोल असून व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. सीमा हैदर सचिनच्या प्रेमात आकंठ बुडाली अन् पाकिस्तानातून भारतात आली. त्यांची प्रेमकहाणी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

अशातच यशराज मुखाटे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांनी महिलेच्या संवादाने गाणं बनवल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करत मुखाटे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ”लप्पू सा सचिन”. ही पोस्ट शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल झाली असून आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख १३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच लोकांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, ओएमजी, तुम्ही याला रोमॅन्टिक ट्रॅकमध्ये बदललं. दुसरा यूजर म्हणाला, तुम्ही खूप चांगले आहात. तिसऱ्याने म्हटलं, मी याच गोष्टीची वाट पाहत होतो..हाहाहा. अन्य एक यूजर म्हणाला, गाण्याचं मिक्सिंग खूप मजेशीर वाटत आहे. सर्व सचिन शांत राहा आणि गाण्याचा आनंद लुटा, असंही एका यूजरने म्हटलं. तर अन्य एकाने म्हटलं, तुमच्या व्हर्जनची प्रतीक्षा करत होतो. अनेक लोकांनी या व्हिडीओला स्माईली इमोजी पाठवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here