यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची निर्घृण हत्या

Yashswnini mahila brigade -president Murder
Yashswnini mahila brigade -president Murder

अहमदनगर l यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा Yashswnini mahila brigade president रेखा जरे Rekha jare यांची धारदार शस्त्राने हत्या Murder करण्यात आली आहे. ही घटना अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव  घाटात घडली आहे.

रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या. हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.

हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.पोलीस सध्या दुचाकीस्वाकाचा शोध घेत आहेत.

यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासासाठी पोलीस हायवेवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहत आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा l अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन कुत्र्यासोबत खेळताना पडले,पाय फ्रॅक्चर…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here