मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले

cm-uddhav-thackeray-comment-on-mumbai-metro-carshed-shifted-to-kanjurmarg
cm-uddhav-thackeray-comment-on-mumbai-metro-carshed-shifted-to-kanjurmarg

मुंबई l मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलं. मेट्रो प्रकल्पांवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा l FASTag jan 2021 l सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मेट्रोसाठी जर्मन कंपनीकडून कर्ज

“मुंबईच्या कारशेडचा विषय वेगळा आहे. सर्वांना एक सांगावसं वाटत आहे. जर्मनीच्या एका कंपनीकडून आपण ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतं असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे राज्यातील जनतेच्या मेहनीचं फळ आहे. हे आपल्या जनतेचं सरकार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

रेल्वेसाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

महिलांसाठी आपण लोकल सेवा सुरू केल्या आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावर केंद्राशी चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उत्तम सहकार्य करत असल्याचंही त्यानी सांगितलं. तसंच लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.