जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ तारखेला होणार रिलीज

पुढील वर्षी ईदला रिलीज होणार चित्रपट,पोस्ट पाहून चाहते झाले फिदा

john-abraham-releases-satyameva-jayate-2-poster-coming soon-12 may
सत्यमेव जयते -2 john-abraham-releases-satyameva-jayate-2-poster-coming soon-12 may

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने सोशल मीडियावर ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरवर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगणारा “जिस देश की मैय्या गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है” हा डायलॉग देण्यात आला आहे. जॉनने पोस्टर शेअर करताना चित्रपट पुढील वर्षी ईदला १२ मे २०२१ ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी ‘हल्क’सारखा लूक अपेक्षित असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हल्कला जॉन अब्राहमचा फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर आता जॉन अब्राहमने चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं त्याची शरीरयष्टी पाहून चाहते फिदा झाले होते. आधीच्या चित्रपटाप्रमाणे सिक्वेलमध्येही देशभक्तीवर आधारित कथा असल्याचं पोस्टवरुन स्पष्ट दिसत आहे.

मनोरंजनच्या या स्टोरी पाहा एका क्लिकवर click

मिलाप झवेरी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी जॉनने हल्कचा पोस्टर शेअर करत मिलाप झवेरी यांना असणारी अपेक्षा सांगितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here