MCA Election 2022 : एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल काळे विजयी, संदीप पाटलांचा पराभव!

sharad-pawar-ashish-shelar-panel-candidate-amol-kale-elected-as-mca-chief-news-update-today
sharad-pawar-ashish-shelar-panel-candidate-amol-kale-elected-as-mca-chief-news-update-today

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी (Mumbai cricket association election 2022) अमोल काळे (Amol kale) यांची वर्णी लागलेली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील (Sandeep patil) विरुद्ध अमोल काळे (Amol kale) असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते.

मागील अनेक दिवसांपासून एमसीए अध्यक्षपादाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र आले होते. आज (२० ऑक्टोबर) पार पडलेल्या निवडणुकीत एकूण ३८० मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय झाला आहे.

शरद पवार यांच्या पॅनलने सुरुवातीला अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला. शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले. आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.

अशी मिळाली मतं?

अमोल काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे संदीप पाटील हे माजी क्रिकेटपटू आहेत. या निवडणुकीत अमोल काळे यांना १८३ मतं मिळाली तर संदीप पाटलांना एकूण १५८ मतं मिळाली. म्हणजेच अमोल काळे यांचा २३ मतांनी विजय झाला आहे. निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here