मलाही मुख्यमंत्री व्हायचंय; जयंत पाटलांनी व्यक्त केली इच्छा!

jayant-patil-ncp state president- Minister water Resources -corona-positive
jayant-patil-ncp state president- Minister water Resources -corona-positive

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील jayant patil यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  विचारणा केली असता त्यांनी माझा पाठिंबा आहे, असं उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही.

माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत.

इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

हेही वाचा: Arnab Chat Gatel“भाजपच्या शेंबड्यांनो, तुमच्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर बोला”

जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे.

आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्री आलेलं आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असं सत्तावाटपावेळी ठरलेलं आहे. मात्र राजकारणात इच्छा व्यक्त करणे गैर नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here