तिसऱ्या मुंबईच्या गोंडस नावाखाली भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर, जिल्हा परिषद निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांची: हर्षवर्धन सपकाळ

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाकडून टाळाटाळ, विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा.

Under the pretext of the“Third Mumbai
Under the pretext of the“Third Mumbai" project capitalism has reached the doorstep of Raigad; the Zilla Parishad election is about the rights of the sons of the soil: Harshvardhan Sapkal

मुंबई : हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेतदोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहेआपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा आणि काँग्रेस मविआच्या उमेदवारांना विजयी कराअसे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Sapkal यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड जिल्ह्यातील जासईचिरनेरसातिर्जेचोंढी येथे प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले कीजिल्हा परिषद निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय आपलाच आहे हे आत्ताच दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस मविआला चांगले यश मिळेल व सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात असतील. लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी मोठा लढा दिलाआता पुन्हा भूमिपुत्रांसमोर भांडवलदारांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या भांडवलशाहीला थांबवण्यासाठी काँग्रेस मविआला विजयी करा असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच केली आहे. पण देवेंद्र फडणवीस मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यास टाळाटाळ करत आहेत. आताच विमानतळाचे एनएम नाव दिसत आहे पण एनएमच्या आडून नरेंद्र मोदी हे नाव देण्याचा घाट घातला तर तो खपवून घेतला जाणार नाहीअसे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरतराजाभाऊ ठाकूर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here