मुंबई l भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे Eknath-khadse यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट केल्यानंतर ते डिलीट केलं आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत आपल्या प्रवेशाचे सूचक संकेत दिले होते. एकनाथ खडसे यांनी तासाभरातच माघार घेतल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय लिहिलं होतं ट्विटमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.

“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे Eknath-khadse यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो.
वाचा l Aloevera Benefits l मूळव्याधीवर गुणकारी आहे कोरफड; जाणून घ्या फायदे
जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ खडसे Eknath-khadse यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.





































































































































