दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले?, फडणवीस सरकारने खुलासा करावा: सचिन सावंत

मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी

What happened to the recommendations of the Malvani committee regarding the liquor tragedy? The Fadnavis government should clarify: Sachin Sawant
What happened to the recommendations of the Malvani committee regarding the liquor tragedy? The Fadnavis government should clarify: Sachin Sawant

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झालात्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होतीया समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील संबंधित विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही. शासन व प्रशासनातील या बेजबाबदारपणामुळेच पुण्यात २२ बळी गेले. मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झालेयाचा खुलासा फडणवीस सरकारने करावाअशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत Sachin Sawant यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले कीगृहविभागाने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागाला निर्देश दिले होते. या शिफारशींमध्ये मिथेनॉल निर्मिती ते वाहतुकीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रणअवैध गावठी दारु निर्मिती केंद्रावर पोलीस विभागराज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर मोहिम राबावावीमाहितीची देवाणघेवाण करावीसंयुक्त मोहिम राबवून अवैध दारु निर्मिती केंद्रे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यातसातत्यपूर्ण अंमलबजावणी करावीअसे म्हटले होते. त्याचबरोबर संघटित गुन्हेगारझोपडीदादायांच्यावर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणेत्यांच्यावर MPAD  कायद्याअंतर्गत कारवाईराजकीय नेत्यांचे पाठबळ असले तरी कठोर कारवाई करावीअशा अनेक शिफारशी केल्या होत्या. या शिफारसी सर्व विभागांना केल्या असतानाही अशा घटना होणेयाचा अर्थ राज्य सरकार सर्व विभागात अपयशी ठरले आहेअसे सचिन सावंत म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन विभाग कायदा १९४० व इतर अनुषांगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कारवाई करण्यात येईल आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणात्याही व्यक्ती व संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे असे या विभागाच्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहेयाचाच अर्थ आतापर्यत कारवाई होत नव्हती हे यातून स्पष्ट होत आहे. प्रत्येकवेळी घटना झाल्यानंतरच सरकार जागे होणार कायाचे उतर सरकारने द्यावेअसे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

पुण्यात घडलेली विषारी दारू दुर्घटना ही केवळ एका भागातील प्रशासनाच्या अपयशाची घटना नाहीतर राज्य शासनाने पूर्वीच्या दुर्घटनांमधून काही धडा घेतला की नाही याची परीक्षा आहे. मालवणी दारू दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी स्वीकारल्यानंतर त्यांची अंमलबजावणी झाली काहा सर्वात मोठा प्रश्न आहे. याहून गंभीर बाब म्हणजे विषारी दारू दुर्घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी (SOP), अँटिडोटचा साठाडॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांची शिफारस करण्यात आली होती. पुणे दुर्घटनेत या सर्व यंत्रणा कितपत सज्ज होत्यासंबंधित रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते का?

सचिन सावंत पुढे म्हणाले कीमालवणी समितीने अवैध दारू व्यवसायातील आरोपींना सहज जामीन मिळत असल्याने ते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय होत असल्याची गंभीर नोंद केली होती. त्यामुळे कायद्यात बदल करून कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. सरकारने त्यावर कोणती कार्यवाही केलीजर मालवणी दुर्घटनेनंतरच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी झाली असतीतर पुण्यातील ही दुर्घटना टाळता आली नसती कासरकारने केवळ स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित करून जबाबदारी संपल्याचे समजू नये. मालवणी समितीच्या प्रत्येक शिफारसीवर आतापर्यंत काय अंमलबजावणी झालीकोणत्या शिफारसी प्रलंबित आहेत आणि त्या का राबविण्यात आल्या नाहीतयाचा खुलासा सरकारने करावा.

पुण्यातील विषारी दारु दुर्घटनेनंतर भिंवडीसह काही ठिकाणी धाडी टाकून मिथेनॉलचे साठे व हातभट्ट्या उद्ध्वस्थ करण्यात आल्या. एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासन का जागे होतेइतरवेळी अशा धडक कारवाया का केल्या जात नाहीतपुण्यातील घटना होईपर्यंत पोलीसराज्य उत्पादन शुल्क विभागभरारी पथक यांना या हातभट्ट्या दिसल्या नाहीत कापुणे भरारी पथक व राज्याचे भरारी पथकाने पुण्यातील गुन्हेगारांवर एकही गुन्हा दाखल केलेला नव्हता..४० वर्षे हातभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या माहिती प्रशासनाच्या एकाही व्यक्तीला नव्हती असे म्हणणे हे खुळेपणाचे ठरले. यामध्येच राज्याचे वरिष्ठ नेतृत्व ते खालच्या अधिकाऱ्यांपर्यत माहिती होती हे स्पष्ट आहेअसेही सावंत म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here