“संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत’’; नाना पटोलेंनी सुनावलं,म्हणाले…

A worker who worked with common people is lost!: Nana Patole
A worker who worked with common people is lost!: Nana Patole

मुंबई : महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीत नाशिक, नागपूर आणि अमरावतीच्या उमेदवारीवरून बराच गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं होतं.

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. मी आज मंगळवार १७ जानेवारी  अमरावतीत आहे. उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माहिती माध्यमांना देऊ,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही. शिवसेनेने शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला आहे. याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचं, तर सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे नागपूरची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. पुन्हा गोंधळ होऊ नये, हा धडा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाने घेतला पाहिजे. प्रत्येक वेळा त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवर असते. हा त्याग आम्ही करत आलो आहोत. पण, यापुढे असं होणार नाही,” असं इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here