बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना सामना रंगणार

bihar-assembly-election-shivsena-contest-candidate-gupteshwar-pandey-bihar-ex-dgp
बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना सामना रंगणार bihar-assembly-election-shivsena-contest-candidate-gupteshwar-pandey-bihar-ex-dgp

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना उतरणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे पांडे विरुध्द शिवसेना असा सामना बिहारमध्ये रंगणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. “सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं.

वाचा : ”मोदी सरकार ‘नन्नाचा पाढा’ किती वेळा कशा कशा बाबतीत म्हणणार,”शिवसेनेचा सवाल

आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती,” अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं.

पांडेंना टक्कर देण्यासाठी आमचा मावळा सज्ज

गुप्तेश्वर पांडे बक्सर जदयूच्या तिकीटावर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. “डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होतं.

या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत,” असंही अनिल देसाई म्हणाले.

वाचा : आजचे राशीभविष्य,7ऑक्टोबर: पाहा 12 राशींचे बुधवारचे भविष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here