Rashmi Rocket l हार जीत तो परिणाम है, कोशिश तो हमारा काम है, रश्मी रॉकेटचा ट्रेलर प्रदर्शित

rashmi-rocket-movie-trailer-update
rashmi-rocket-movie-trailer-update

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) लवकरच ‘रश्मी रॉकेट’(Rashmi Rocket) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

२ मिनिटे ५० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये कच्छ मधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. तिच्याकडे धावण्याची एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. रश्मीला देशासाठी अॅथलेटिक स्पर्धा जिंकायची असते. पण तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तापसी पन्नूचा अभिनय पाहाण्यासारखा आहे.

दिग्दर्शक आकाश खुराना आणि तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी रॉकेट हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्यात ५८ कोटी रुपयांची डील झाल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here