बापरे : महाराष्ट्रात आज ३,५५८ कोरोनाचे रुग्ण सापडले

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

मुंबई l महाराष्ट्रात Maharshtra आज ३,५५८ नवे कोरोनाबाधित Covid19 news cases रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू Dead-34-people झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे.

आज २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजच्या ३४ मृतांच्या संख्येमुळे कोरोनामुळं आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ५४,१७९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा l शरद पवारांना हवी सुरक्षेत कपात, गृहमंत्र्यांना फोन करुन म्हणाले…

पुण्यात आढळले तब्बल २६४ रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आजअखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे.

दरम्यान, ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आजअखेर १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा l Maratha reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी नवी दिल्लीत वकिलांची बैठक

हेही वाचा l हेही वाचा : उध्दव ठाकरे म्हणाले, पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here