मुंबई:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांना लिहिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहे. सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे.
वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे.



















































































































































































