फडणवीस जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर म्हणाले….

जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच मांडणार

Aurangabad city police will solve the issue of settlements on priority basis
Aurangabad city police will solve the issue of settlements on priority basis

मुंबई l  जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.  उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी जरुर करावी. ही मंत्रालयात सह्या करुन टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं झाली आहेत. सहा लाख कामं विकेंद्रीत पद्धतीनं झाली आहेत.

वाचा l Flipkart Big Billion Day लॅपटॉप,टीव्ही,कपडे,फर्निचरसह इतर वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स

जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंधारण, वन विभागानं कामं केली आहेत. एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक पातळीवर टेंडर काढून ही कामं झाली आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“७०० तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये ७०० तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात.

जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करणार आहे,” असं यावेळी  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

प्रत्येत गावात, तालुक्यात जाऊन शेतक-याचं मतच नोंदवणार

”कोरोना संकट संपू द्या आम्ही प्रत्येत गावात, तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मतच नोंदवणार आहे. आमच्याकडे आधीपासून ते आहेदेखील. अनेक शेतकऱ्यांनी काय फायदा झाला हे सांगितलं आहे. जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच मांडणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे”.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here