Maharashtra Lockdown l महाराष्ट्रात लॉकडाऊनचा आज फैसला;मंगळवारी होणार घोषणा!

अन्यथा १५ एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल

maharashtra-government-declare-corona-omicron-new-guidelines-today-after-cm-uddhav-thackeray-taking-meeting-with-task-force-omicron-and-corona-cases-increased-in-state-news-update
maharashtra-government-declare-corona-omicron-new-guidelines-today-after-cm-uddhav-thackeray-taking-meeting-with-task-force-omicron-and-corona-cases-increased-in-state-news-update

मुंबई l मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना Corona रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवसांसाठी तरी कठोर निर्बंध लागू करावेच लागतील. मात्र, जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्वसूचना देऊन निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी महाराष्ट्रात काही दिवस लॉकडाऊन Maharashtra Lockdown अटळ असल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले. आज रविवारी टास्क फोर्ससोबत Taskforce बैठकीत लॉकडाऊन किती दिवसांचा करण्यात येईल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. 

…अन्यथा १५ एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, आरोग्यसुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. उपमुख्यमंत्री  अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी बैठकीत सहभागी झाले होते. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोरोनास्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे, त्याची माहिती दिली. टाळेबंदीसारख्या कडक र्निबधांची गरज असून, अन्यथा १५ एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल, याकडे कुंटे यांनी सर्वाचे लक्ष वेधले.

पण कठोर निर्बंध लावावेच लागतील

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना, पण कठोर निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कठोर निर्बंध लागू करताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये, हीच भूमिका आहे.

त्यादृष्टीने जरूर विचार केला जाईल. पण, दररोज झपाटय़ाने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दांत लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले. तसेच सर्वानुमते निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सर्व पक्षांना केले.

आता रुग्णशोध मोहिमेत अडचणी येत आहेत

आपण सर्वसमावेशक नियोजन करू. तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू. पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीत लोक घरी होते. त्यामुळे रुग्णशोध मोहीम सोपी होती. आता रुग्णशोध मोहिमेत अडचणी येत आहेत. एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. इंग्लंडमध्ये दोन महिने कडक ल़ॉकडाऊन करून त्या काळात मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित करण्यात आले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर सोसावीच लागेल

आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. एका बाजूला जनभावना आहे, पण दुसऱ्या बाजूला करोनाचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर सोसावीच लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृती गटाच्या तज्ज्ञांचे म्हणणेही आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे. शुक्रवारी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील

रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील. तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. टाळेबंदी अचानक लागू करू नये. तत्पूर्वी सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी के ली. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here