कोरोनाचा हाहाकार l जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश

lockdown-coronavirus-outbreak-india-cases-vaccination-live-update-16-april-news-updates
lockdown-coronavirus-outbreak-india-cases-vaccination-live-update-16-april-news-updates

नवी दिल्ली l देशात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.lockdown-coronavirus-outbreak-india-cases-vaccination-live-update-16-april-news-updates

भारतात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 15 लाखांच्या पार झाली आहे. आता येथे 15 लाख 63 हजार 588 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश आहे.

यावरुन आपण देशातील कोरोनाच्या कहराचा अंदाज लावू शकतो. या यादीमध्ये पुणे टॉपवर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी परिस्थिती आहे की, देशात जवळपास 120 जिल्ह्यांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांचा तुटवडा आहे.

हेही वाचा: धक्कादायक l औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेशात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत गुरुवारी देशात सर्वात जास्त 61,695 नवीन रुग्ण महाराष्ट्रात सापडले. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. येथे 22,339 लोक संक्रमित आढळले आहेत. दिल्लीमध्ये 16,699, छत्तीसगडमध्ये 15,256, कर्नाटकात 14,738 आणि मध्यप्रदेशात 10,166 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :2.16 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 1,182
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 1.17 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :1.42 कोटी
आतापर्यंत बरे झाले : 1.25 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू :1.74 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 15.63 लाख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here