दिलासादायक l राज्यात २४ तासात १४ हजार ७३२ रूग्ण कोरोनामुक्त

दिवसभरात ८ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित आढळले

maharashtra-reports-9336-new-covid-cases-and-123-deaths-in-the-past-24-hours-news-update
maharashtra-reports-9336-new-covid-cases-and-123-deaths-in-the-past-24-hours-news-update

मुंबई l राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) देखील वाढताना दिसत आहे.

राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील २४ तासात राज्यभरात १४ हजार ७३२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.Maharashtra-records-8129-new-covid19-cases-and-14732-recoveries-in-the-last-24-hours-news-update

राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,४७,३५४ आहे. तर, आजपर्यंत ५६,५४,००३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, १,१२,६९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यू दर १.९० टक्के आहे. तर, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,१७,१२१ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ नमुने (१५.४८ टक्के) कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. राज्यात सध्या ९,४९,२५१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ५ हजार ९९७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here